दमास्कस - गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये सातत्याने हल्ले करणाऱ्या इस्राईलने आपला मोर्चा आता सीरियाकडे वळविला आहे. सीरियात इस्राईलच्या हवाई दलाने तुफान बॉम्ब हल्ले केल्याची माहिती सीरियातील युद्ध निरीक्षकांनी दिली. इस्राईलचे सैनिक सीरियात बरेच आतमध्ये शिरल्याने हल्ले केल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र इस्राईलचे सैन्य दमास्कसच्या दिशेने जात असल्याचा दावा इस्राईलच्या अधिकाऱ्यांनी फेटाळला.