Israel Hamas Conflict : हमासच्या निर्दालनासाठी इस्राईलची विशेष मोहीम; गेल्या २४ तासांत मोठे हल्ले, अपहृतांच्या सुटकेचे उद्दिष्ट
Gaza Attacks : इस्राईलने हमासचे निर्दालन करण्यासाठी आणि गाझामधील अपहृतांची सुटका करण्यासाठी ‘ऑपरेशन गिदोन चॅरियट्स’ मोहिमेची सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासांत मोठ्या हल्ल्यांद्वारे सैन्य कारवाई वाढवण्यात आली आहे.
तेल अवीव : इस्राईलच्या सैन्यदलाने हमासला पराभूत करण्यासाठी आणि गाझामधील उर्वरित अपहृतांची सुटका करण्यासाठी मोठ्या हल्ल्याची घोषणा केली आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन गिदोन चॅरियट्स’ असे नाव दिले आहे.