Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

इस्राईलने केलेली ही घोषणा इजिप्तची सीमा आणि त्याला लागून असलेल्या राफा शहरातील महामार्गाच्या बारा किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यापर्यंतच लागू असेल.
Israel military announced pause fighting during daytime in southern Gaza  Jerusalem
Israel military announced pause fighting during daytime in southern Gaza JerusalemSakal
Updated on

जेरुसलेम : मदतकार्य करणाऱ्या संस्थांना गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांपर्यंत मदतसाहित्य पोहोचविता यावे आणि त्यांना अडथळा येऊ नये, यासाठी दिवसाउजेडी कोणतेही हल्ले न करण्याचा निर्णय इस्राईलच्या लष्कराने जाहीर केला आहे. दररोज सकाळी आठ ते रात्री सात वाजेपर्यंत या युद्धबंदीची अंमलबजावणी होणार आहे.

इस्राईलने केलेली ही घोषणा इजिप्तची सीमा आणि त्याला लागून असलेल्या राफा शहरातील महामार्गाच्या बारा किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यापर्यंतच लागू असेल. संपूर्ण गाझामध्ये शस्त्रसंधीची अंमलबजावणी व्हावी, अशी आंतरराष्ट्रीय समुदायाची मागणी असताना इस्राईलने फक्त राफामधील काही भागापुरताच हा निर्णय घेतला आहे.

तरीही, राफामध्येच बहुसंख्य पॅलेस्टिनी विस्थापित होऊन आले असल्याने आणि इस्राईलकडून या भागात अनेक हल्ले होत असल्याने नव्या घोषणेमुळे मदतसाहित्य पोहोचविण्याच्या कामाला वेग येणार आहे. हल्ल्यांमुळे लाखो नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचाही तुटवडा भासत आहे. मदतसाहित्याचे ट्रक सीमेजवळ इजिप्तच्या हद्दीत उभे असतानाही हल्ल्यांमुळे अनेकवेळा मदतकार्य थांबविले जात होते.

इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धाचा हा नववा महिना आहे. इस्राईलच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टीतील अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून एकूण बावीस लाख लोकसंख्येपैकी किमान १८ ते १९ लाख जण राफा शहर आणि परिसरात आले आहेत.

स्फोटात आठ सैनिकांचा मृत्यू

राफा शहरामध्ये झालेल्या एका स्फोटात इस्राईलच्या आठ सैनिकांचा आज मृत्यू झाला. राफा शहरामध्ये हमासचे अनेक दहशतवादी सामान्य नागरिकांमध्ये मिसळून राहात असल्याचा इस्राईलचा दावा असल्याने येथे मोठ्या संख्येने सैनिक तैनात आहेत. हा स्फोट म्हणजे हल्लाच असल्याचा दावा इस्राईलने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com