.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जेरूसलेम : हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेकडून होत असलेल्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्राईलने आज लेबनॉनच्या दक्षिण भागात जोरदार हवाई हल्ले करत हिज्बुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. हिज्बुल्लाकडून मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू असल्यानेच खबरदारीचा उपाय म्हणून हे हल्ले केल्याचे इस्राईलने सांगितले.