
जेरूसलेम : हमासने शनिवारपर्यंत आणखी काही अपहृतांना न सोडल्यास युद्धबंदीच्या करारातून माघार घेत पुन्हा एकदा हल्ले सुरू करू, असा इशारा इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच सल्ला त्यांना दोन दिवसांपूर्वी दिला होता.