Israel Airstrikes : इस्राईलकडून आण्विक संशोधन केंद्र लक्ष्य; संघर्ष शिगेला, तीन लष्करी कमांडरचा देखील खात्मा
Military Conflict : इस्राईली लष्कराने इराणच्या तीन लष्करी कमांडरना ठार केले असून, इराणने देखील तेलअवीव आणि अन्य शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षावर हस्तक्षेप न करण्याची भूमिका घेतली आहे.
तेलअवीव : इस्राईली लष्कराने आज पुन्हा एकदा इराणच्या वर्मी घाव घालताना त्यांच्या तीन लष्करी कमांडरला ठार मारले. यामध्ये ड्रोन युनिट, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड (आयआरजीसी) कोअर, कुर्द फोर्स आणि पॅलेस्टिनी घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे.