
Syria : इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने सीरियाची राजधानी दमिश्क हादरली; १५ जणांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी भूकंपाने हादरलेला सिरिया इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने हादरला आहे. आज (रविवारी) इस्रायलने सीरियाची राजधानी दमिश्कमधील निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र डागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (रविवारी) सकाळी इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर क्षेपणास्त्र डागत मोठा हल्ला केला आहे. इस्रायलने थेट रहिवाशी इमारतीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
तर अनेक जण हल्ल्यात जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. भूकंपाने हादरलेल्या सीरियावर इस्रायलने क्षेपणास्त्र डागल्याने सीरियाच्या संकटात आणखी भर पडली आहे
दहशतवाद्यांचा प्राणघातक हल्ला; हल्ल्यात 53 नागरिकांचा मृत्यू
गेल्या शुक्रवारी सीरियातील होम्समध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. यात जवळ-जवळ 53 लोकांचा मृत्यू झाला होता. जेव्हा नागरिकांवर हल्ला झाला तेव्हा पीडित वाळवंटातील ट्रफल्स गोळा करत होते. पाच जखमींना अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वाचलेल्यांपैकी एकानं सांगितलं की, ISIS नं आमच्या गाड्या जाळल्या आहेत. मात्र, संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी तातडीनं स्वीकारलेली नाहीये.