
जेरुसलेम : गाझा पट्टीतून पॅलेस्टिनी नागरिकांना शेजारील देशांमध्ये स्थलांतरीत करण्याच्या अमेरिकेच्या योजनेवर गंभीरपणे काम सुरू असल्याचे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज स्पष्ट केले. एका वेगळ्या भविष्याच्या निर्मितीसाठी हीच योजना योग्य आहे, असेही नेतान्याहू म्हणाले. अमेरिकेच्या या योजनेला पॅलेस्टिनी नागरिकांचा तीव्र विरोध आहे.