Benjamin Netanyahu : इस्राईलमधील नेतान्याहू यांचे सरकार तरले
Israel Politics : इस्राईलमध्ये हरेदिम समुदायासाठी लष्करी सेवेची सूट रद्द करण्याच्या प्रस्तावावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. नेतान्याहू सरकार अल्पमतात येण्याच्या उंबरठ्यावर असतानाही संसद विसर्जनाचा ठराव फेटाळण्यात आला.
जेरुसलेम : इस्राईलमधील बेंजामिन नेतान्याहू सरकार गुरुवारी अडचणीत सापडले होते. इस्राईलची संसद विसर्जित करण्याचा ठराव विरोधी पक्षांनी मांडला. नेतान्याहू यांच्या पुराणमतवादी गटाच्या सहकारी पक्षांनीही यामध्ये विरोधकांची बाजू घेतली.