
खान युनिस : हमासच्या दहशतवाद्यांनी आज इस्राईलच्या तीन अपहृतांना रेड क्रॉस संघटनेच्या ताब्यात दिले. त्यापूर्वी त्यांना प्रचंड मोठ्या जमावासमोर उभे करण्यात आले होते. यानंतर रेड क्रॉस संघटनेने या तिघांनाही इस्रायली सैन्याकडे सुपूर्द केले. कराराचा भाग म्हणून इस्राईल आज रात्री काही पॅलेस्टिनी कैद्यांची तुरुंगातून मुक्तता करणार आहे.