कोरोनाचा खेळ खल्लास? WHO म्हणतं, 'ओमिक्रॉन हा शेवटचा...' | WHO Statement on Omicron Variant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WHO Statement on Omicron Variant

कोरोनाचा खेळ खल्लास? WHO म्हणतं, 'ओमिक्रॉन हा शेवटचा...'

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या विषाणूने माणसांच जगणं मुश्किल करुन ठेवलं आहे. कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत असून संपूर्ण जगच या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूमुळे वेठीला धरलं गेलं आहे. भारतात सध्या कोरोनाची तिसरी लाट आली असून ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे ती आल्याचं तज्ज्ञ सांगतात. कोरोना या विषाणूचे अनेकानेक व्हेरियंट प्रसारित होत असून डेल्टानंतर आता ओमिक्रॉनचा धुमाकूळ पहायला मिळतो आहे. (Omicron Variant Corona)

हेही वाचा: शरद पवार कोरोना संक्रमित कळताच PM मोदींना काळजी; लगेच केला फोन!

डेल्टा या व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनची लाट तशी सौम्य असल्याचं दिसून येतंय. त्याच्या संसर्गाची संख्या तीव्र असली तरीही गंभीर होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र, ओमिक्रॉन हा आता शेवटचा व्हेरियंट असेल का? अशी चर्चा सुरु आहे. कोरोनाचा हा सगळा खेळ गेल्या दोन वर्षांपासून सुरु असून आता त्याचा समारोप जवळ आलाय का? अशीही शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात असतानाच आता जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.(WHO Statement on Omicron Variant)

हेही वाचा: 'डिनर विथ केजरीवाल!' निवडणूकांसाठी 'आप'चा नवा फंडा आहे तरी काय?

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय की, ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट असेल किंवा आपण आता कोरोनाचा शेवटचा खेळ खेळत आहोत, असे मानणे धोकादायक आहे.

कोरोना या विषाणूची आता पर्यंत जगभरात सुमारे ३५.१ कोटी लोकांना बाधा झाली आहे. तर जगभरात ५६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णंसंख्येमध्ये आणि कोरोनाच्या मृत्यूसंख्येमध्ये जगभरात अमेरिकेचा क्रमांक पहिला लागत असून त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत ३.९५ कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली असून ४.९ लाख म्हणजेच जवळपास पाच लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

Web Title: It Is Dangerous To Assume That Omicron Will Be The Last Variant Or That We Are In The Endgame World Health Organisation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top