इटलीत कोरोनाचे थैमान; एका दिवसात 651 मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोना विषाणू संसर्गाची सर्वाधिक झळ बसलेल्या इटलीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 651 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत इटलीतील संख्या सर्वांत जास्त आहे. आतापर्यंत इटलीमध्ये कोरोनामुळे 5476 जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिलान : कोरोना विषाणूने जगभरात सर्वांत जास्त थैमान घातलेल्या इटलीमध्ये एका दिवसांत 651 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 5476 एवढी झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची सर्वाधिक झळ बसलेल्या इटलीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 651 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत इटलीतील संख्या सर्वांत जास्त आहे. आतापर्यंत इटलीमध्ये कोरोनामुळे 5476 जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संसर्गामुळे इटलीतील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून अनेक भागांमध्ये भीतीपोटी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही लोक पुढे येत नाहीत. देशातील नागरिकांभोवतीचा या विषाणूंचा फास आणखी आवळल्या गेला असून रस्ते, चौक, रेस्टॉरंट ओस पडले आहेत. रोमपासून नेपल्सपर्यंत आणि व्हेनिसपासून फ्लोरेन्सपर्यंत सर्व लोकांनी आता स्वत:ला घरामध्ये कोंडून घेतले आहे. इटलीतील ज्या कोडोग्नो शहरातून या विषाणूचा संसर्ग सुरू झाला तेथील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इटलीमध्ये सध्या पूर्णपणे टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून आवश्‍यक कामांसाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. 

इटलीमध्ये आतापर्यंत 59 हजार 138 जणांना या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एका दिवसांत या आकड्यामध्ये सहा हजारांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत 7024 नागरिक या आजारातून सावरले आहेत. उत्तर इटलीतील लोंबार्दी प्रांताला या विषाणूमुळे सर्वांधिक फटका बसला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Italy coronavirus deaths rise by 651 in a day

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: