'मी सगळ्यासाठी जबाबदार...' Twitter चे फाऊंडर जॅक डोर्सी यांनी मागितली माफी

ट्विटरच्या 7500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
Jack Dorsey
Jack Dorseyesakal
Updated on

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीसह जगभरातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरच्या 7500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अधिक भारतीय वंशाचे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दरम्यान, ट्विटरचे फाऊंडर जॅक डोर्सी यांनी स्वतःला जबाबदार धरत सर्व कामगारांची माफी मागितली आहे. (Jack Dorsey apologises to Twitter employees for mass layoffs after Musk takeover)

एलन मस्क हे ट्विटरचा नवा बॉस झाल्यापासून त्यांनी कंपनीत अनेक मोठे बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे. दरम्यान, आता ट्विटरचे संस्थापक जॅकी डोर्सी यांनी ट्विट करून लोकांची माफी मागितली आहे. यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली त्याला मीच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

मला सतत असं वाटत आहे की, बरेच लोक माझ्यावर नाराज आहेत. मला मान्य आहे की माझ्यामुळे सर्वजण या परिस्थितीत आहेत. मी कंपनीला खूप वेगाने मोठं केलं. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो. क्षण कितीही कठीण असला तरी त्यांना नेहमीच मार्ग सापडतो. अशा आशयाचे ट्विट डोर्सी यांनी केलं आहे.

त्यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. डोर्सी यांनी या वर्षी मे मध्ये ट्विट करत राजीनामा दिला होता. 2007 पासून ते ट्विटरचे संचालक आहेत. 2015 पासून राजीनामा देईपर्यंत ते ट्विटरचे सीईओ होते.

कामावरून काढून टाकण्यात आलेल्या ट्विटरमधील कर्मचाऱ्यांनी सॅन फ्रान्सिस्को फेडरल कोर्टात क्लास-अॅक्शन लॉ खटला दाखल केला आहे. कंपनी पुरेशी सूचना न देता हे सर्व करत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. हे फेडरल आणि कॅलिफोर्निया कायद्याचे उल्लंघन आहे.

सीईओंची हकालपट्टी

जागतिक स्तरावर कर्मचार्‍यांची संख्या कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून ट्विटरने भारतातील कर्मचार्‍यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग अग्रवाल, मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) आणि इतर काही उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले. त्यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर लगेचच त्यांची हकालपट्टी केली. यानंतर उच्च व्यवस्थापनातील अनेकांनी राजीनामे दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com