
बीजिंग : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) चीनमधील तिआंजिनमध्ये येथे झालेल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘‘सदस्य देशांनी संघटनेच्या स्थापनेच्या उद्दिष्टांप्रति प्रामाणिक राहून दहशतवादाबाबत कोणतीही तडजोड न करता ठाम भूमिका घ्यावी,’’ असे आवाहन जयशंकर यांनी यावेळी केले.