Shinzo Abe News: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार | Shinzo Abe Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinzo Abe News Updates
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार

BREAKING: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार

माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना नारा शहरात गोळ्या घालण्यात आल्याचे वृत्त जपानच्या NHK ने दिले आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर एका भाषणादरम्यान पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात ते जखमी झाल्याची शक्यता आहे. NHKया जपानी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या पत्रकाराने या ठिकाणी गोळी झाडल्यासारखा आवाज ऐकला आणि शिंजो आबे जखमी झाल्याचंही पाहिलं. (Shinzo Abe News Updates)

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण करत असताना मागून एका व्यक्तीने हल्ला केला. पोलिसांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.

Web Title: Japan Former Prime Minister Shinzo Abe Has Been Shot In Japan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Japan
go to top