जपानी ‘फुगाकू’ ठरला सर्वांत वेगवान संगणक 

Fugaku
Fugaku
Updated on

टोकियो -  जपानच्या ‘फुगाकू’ संगणकाने अमेरिकेच्या आयबीएमच्या संगणकावर मात करीत जगातील सर्वांत वेगवान संगणक म्हणून मान मिळविला आहे. अमेरिका आणि चीनची गेल्या दशकभरात निर्माण झालेली मक्तेदारी मोडून काढत जपानने अकरा वर्षांनंतर अव्वल क्रमांक पटकाविला आहे. हा संगणक आता कोरोनाविरुद्धच्या लढाईतही वापरला जाणार आहे. 

जगातील सर्वांत वेगवान ५०० संगणकांची यादी प्रसिद्ध झाली असून, त्यात ‘फुगाकू’ला अव्वल स्थान देण्यात आले आहे. फुगाकू संगणक अमेरिकेच्या ‘आयबीएम’ कंपनीच्या ‘समिट’ संगणकापेक्षा २.८ पट अधिक वेगवान असल्याचे सिद्ध झाले आहे. एका खोलीएवढ्या आकाराचा ‘फुगाकू’ जपानमधील कोबे या शहरात ठेवण्यात आला आहे. जपानमधील तंत्रज्ञान कंपनी फुजित्सु आणि रिकेन इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तपणे हा संगणक विकसित केला असून, त्यासाठी सहा वर्षांचा काळ लागला. जपानमधील प्रसिद्ध ‘माउंट फुजी’ला ‘फुगाकू’ या नावानेही ओळखले जाते. तेच नाव संगणकाला देण्यात आले आहे. 

दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होणाऱ्या या यादीत जगभरात वितरित न झालेले मात्र सर्वाधिक शक्तिशाली असलेल्या महासंगणकांची यादी असते. सर्वसाधारण संगणकापेक्षा एक हजार पट वेगवान असलेल्या संगणकांना महासंगणक म्हणतात. यादीत तिसरा क्रमांक ‘आयबीएम’च्याच दुसऱ्या एका संगणकाला मिळाला असून, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर चीनचे महासंगणक आहेत. 

कोरोनाविरोधातील लढाईत वापर 
सर्वांत वेगवान असलेल्या फुगाकू संगणकाचा कोरोनाविरुद्धच्या लढार्इत वापर आधीच सुरू झाला आहे. खिडक्या उघड्या असताना ऑफिसमध्ये अथवा रेल्वे डब्यांमध्ये पाण्याचा तुषार कसा पसरला जातो, याचा अभ्यास या संगणकाच्या साह्याने केला जात आहे. हा संगणक पुढील वर्षी पूर्णपणे कार्यरत होणार असून, त्याची कोरोनावरील प्रभावी उपचार शोधण्यातही मदत होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

‘फुगाकू’चा वेग 
एका सेकंदात संगणक किती प्रक्रिया करू शकतो, यावरून त्याचा वेग मोजतात. हा वेग पेटाफ्लॉप्स या एककात मोजतात. पेटाफ्लॉप्स म्हणजे एक या आकड्यापुढे १६ शून्य. अमेरिकेच्या ‘समिट’चा वेग १४८.६ पेटाफ्लॉप्स इतका आहे. ‘फुगाकू’ने ४१५.५३ पेटाफ्लॉप्स इतक्या वेगाची नोंद केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com