
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आज पायउतार होणाऱ्या ज्यो बायडेन यांनी चार वर्षांपूर्वी सूत्रे हाती घेतल्यानंतर काही महिन्यांतच एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता.या निर्णयाची व्याप्ती अमेरिकेपुरती मर्यादित असली तरी जगभरातील मानवी हक्कांच्या चळवळीत आणि इतिहासात या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हा निर्णय म्हणजे अमेरिकेत फेडरल म्हणजे सर्व राज्यांत १९ जून रोजी सार्वत्रिक सुट्टी जाहीर करणे.