बायडेन यांचं फॅमिली सेलिब्रेशन; शेअर केले भावूक फोटो

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन (Joe Biden) निवडून आल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, त्यांचे सेलिब्रेशनचे दोन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

वॉशिंग्टन - अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन (Joe Biden) निवडून आल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, त्यांचे सेलिब्रेशनचे दोन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये नात निओमी बायडन आणि पत्नी डॉक्टर जिल बायडेन या दोघींनी वेगवेगळे फोटो शेअर केलेल्या फोटोंचा समावेश आहे. निओमी बायडेनने फोटो शेअर करताना त्याची तारीख टाकली आहे. 7 नोव्हेंबर 2020 हीच तारीख टाकली आहे. याच दिवशी निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला होता. 

निवडणुकीत विजय मिळाल्याचं बायडेन यांच्या घरी समजताच घरच्या लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी संपूर्ण कुटुंबाने त्यांना अलिंगन दिल्याचा फोटो निओमीने शेअर केला आहे. आपले आजोबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे समजताच घरी कसं वातावरण होतं हे दाखवणारा फोटो नाओमीने ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

बायडेन यांची पत्नी डॉक्टर जिल बायडेन यांनीही एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ज्यो बायडेन यांच्यासोबत त्यांनी एक बोर्ड हातात धरला आहे. त्या बोर्डवर DR and Vice President Biden Live Here असं लिहिलेलं आहे. मात्र फोटो काढताना जिल बायडेन यांनी बोर्डवर असलेल्या Vice शब्द हाताने झाकला आहे. बायडेन आपल्या सर्व कुटुंबाचे राष्ट्राध्यक्ष असतील असा कॅप्शन या फोटोला दिला आहे.

US Election: बायडेन यांच्या विजयावर ट्रम्प आणि चीनची मानसिकता सारखीच

ज्यो बायडेन निवडणुकीत विजयी झाले असले तरी अद्याप ट्रम्प यांनी पराभव स्वीकारलेला नाही. त्यांचा न्यायालयात जाण्याचा पवित्रा कायम आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ट्रम्प यांनी व्हाइट हाउस सोडण्यास नकार दिला तर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याची तयारी बायडेन यांच्या टीमने केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: joe biden family celebration aftre win us presidential election