esakal | कोरोनाचा फटका; भारतातील प्रवाशांना अमेरिकेतही बंदी

बोलून बातमी शोधा

Modi Biden
कोरोनाचा फटका; भारतातील प्रवाशांना अमेरिकेतही बंदी
sakal_logo
By
नामदेव कुंभार

कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, न्यूझीलंड, मालदीव यांच्यानंतर अमेरिकेनेही आता भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली. मागील 14 दिवसांपासून भारतात राहणाऱ्या अमेरिका वगळता इतर देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 4 मे पासून हे निर्बंध लागू होणार आहेत. भारतातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतामध्ये कोरोनाचे विविध स्ट्रोन कार्यरत असल्यामुळे अमेरिकेनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

अमेरिकाने आपल्या नागरिकांसाठी, ग्रीन कार्ड असणाऱ्यांना आणि त्यांच्या जोडीदारासाठी तसेच 21 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्यांना निर्बंधामध्ये विशेष सूट दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लावलेले निर्बंध अनिश्चितकाळासाठी आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहे. शैक्षणिक, विद्यार्थी आणि पत्रकारांनाही यामध्ये विशेष सूट देण्यात आली आहे. जो बायडन म्हणाले की, ‘‘ मागील 14 दिवसांपासून भारतात राहणाऱ्या अमेरिका व्यतिरित्क इतर नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेतील नागरिकांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आवा आहे.’’ आरोग्य आणि मानव मंत्रालय आणि रोग नियंत्रण केंद्र (सीडीसी) यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं, बायडन यांनी सांगितलं.

भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं पसरत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटींकडे पोहचली आहे. भारतात कोरोना महामारी वेगानं पसरत आहे. जगातील एक तृतीय अंश कोरोनाबाधित रुग्ण एकट्या भारतात आहेत. गेल्या आठवड्यापासून भारतात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घ्यावा लागाल, असेही बायडन म्हणाले.