
Biden Viral Photos : "वेश्यांसोबत सेक्स ते ड्रग्ज..." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या मुलाचे फोटो लीक
Biden Viral Photos : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या मुलाचे धक्कादायक फोटो व्हायरल झाले आहेत. हंटर बिडेन याच्या लॅपटॉपमधून जवळपास ९००० फोचो हस्तांतर करण्यात आले आहेत. मार्को पोलो या उजव्या विचारसरणीच्या गटाने ते फोटो प्रकाशित केले आहेत.
BidenLaptopMedia.com या वेब साईटवर हंटर बायडन ड्रग्ज घेताना, वेश्यांसोबत मस्ती करतानाचे ८,८६४ फोटो आणि त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या छायाचित्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांची पत्नीही दिसत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
डेली मेलच्या अहवालानुसार, हे सर्व फोटो २००८ ते २०१९ मधील आहेत. काबो सॅन लुकास, कोसोवो, चीन, लंडन, पॅरिस, रोम आणि जगभरातील अनेक ठिकाणी हे फोटो काढण्यात आले आहेत. जास्तीत जास्त फोटो हंटर याच्या मॅकबूक प्रो मधून घेतले आहेत.
काही फोटोंमधून हंटर बायडन ड्रग्ज घेत आहेत. तसेच वेश्यांसोबत सेक्स करतानाच्या देखील अनेक फोटो आहेत. यापूर्वी त्याने हे मान्य केले आहे की तो अनेक वर्षांपासून कोकेनच्या व्यसनाचा बळी होता. (Global News)
काही फोटोंमध्ये हॉटेलच्या डेस्कच्या मागे दोन महिलांसोबत नग्न अवस्थेत दिसत आहे. काही फोटोंमध्ये हंटरच्या अंगावर कपडेही दिसत नाहीत. हंटरच्या अनेक आक्षेपार्ह फोटोंमध्ये त्याचे काही कौटुंबिक फोटोही प्रसिद्ध झाले आहेत, ज्यामध्ये त्याचे वडील जो बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन दिसत आहे. एबीपी हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे.