Johnson & Johnson : लहान मुलांच्या या पावडरची विक्री होणार बंद, जाणून घ्या प्रकरण

johnson and johnson announces to stop selling talc based baby powder worldwide
johnson and johnson announces to stop selling talc based baby powder worldwide

Johnson & Johnson Baby Powder : जगभरातील कोट्यवधी महिलांनी कधी ना कधी त्यांच्या बाळांना जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर लावली असेल. एक काळ होता जेव्हा या कंपनीची उत्पादने लहान मुलांसाठी सुरक्षित मानली जात होती. या कंपनीची उत्पादने भारतातही चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. पण पुढच्या वर्षात तुम्हाला या कंपनीची टॅल्क बेस्ड बेबी पावडर बाजारात मिळणार नाही. जॉन्सन अँड जॉन्सनने 2023 मध्ये जगभरात या पावडरची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने गुरुवारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनी 2023 मध्ये जागतिक स्तरावर तिच्या वादग्रस्त टॅल्क-बेस्ड बेबी पावडरची विक्री थांबवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये विक्री थांबवल्यानंतर दोन वर्षांनी जागतिक स्तरावर उत्पादनाची विक्री थांबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की ते टॅल्क-बेस्ड पावडरपासून कॉर्नस्टार्च-आधारित बेबी पावडरचा पर्याय स्विकारत आहेत.

या पावडरबाबत हजारो तक्रारी

रिपोर्टनुसार, कंपनीने 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये टॅल्क-बेस्ड बेबी पावडरची विक्री बंद केली आहे. कंपनीच्या विरोधात जवळपास 38,000 केसेस चालू आहेत, ज्यामध्ये अनेक महिलांचे म्हणणे आहे की ही बेबी पावडर वापरल्यानंतर त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या झाली. कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक सापडल्याचा दावाही अमेरिकन नियामकांनी केला आहे. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले होते. विक्रीत घट झाल्यामुळे उत्तर अमेरिकेतील बाजारपेठेतून ते काढून टाकल्याचे कंपनीने म्हटले होते.

johnson and johnson announces to stop selling talc based baby powder worldwide
Honda लवकरच भारतात लॉंच करणार पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या डिटेल्स

कंपनीचे या संपूर्ण प्रकरणात असे म्हणणे आहे की जगभरातील पोर्टफोलिओ मूल्यांकनाचा एक भाग म्हणून, आम्ही आता सर्वत्र पोर्टफोलिओमध्ये कॉर्नस्टार्च-आधारित बेबी पावडर समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, 2023 मध्ये टॅल्क-बेस्ड पावडर आता जागतिक स्तरावर बंद केले जाईल, तसेच कंपनीने त्यांचे उत्पादन हे सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार त्यामुळे कर्करोग होत नाही असे म्हटले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जॉन्स अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये वापरत असलेले टॅल्क हे जगातील सर्वात मऊ खनिजांपैकी एक आहे. हे अनेक देशांमध्ये तयार केले जाते. कागद, प्लॅस्टिक आणि फार्मास्युटिकल्ससह इतर अनेक उद्योगांमध्येही याचा वापर केला जातो. तज्ञांच्या मते, कधीकधी त्यात एस्बेस्टोस (asbestos) आढळते, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका निर्माण होतो.

johnson and johnson announces to stop selling talc based baby powder worldwide
Vivo V25 Pro भारतात लॉन्चची तारीख कन्फर्म; येथे जाणून घ्या सर्व डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com