जंगल सफारीवेळी पर्यटकावर मोठं संकट; शरिराचा 'तो' भाग गमावला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Operation

जंगल सफारीवेळी पर्यटकावर मोठं संकट; शरिराचा 'तो' भाग गमावला!

केपटाउन : सुट्या लागल्या की अनेकजण पर्यटनासाठी जातात. विविध देशात फिरण्याचा आनंद घेतात. कुटुंबीयांसोबत, मित्रांसोबत आनंदी वेळ घालवला जातो. तसेच अनेकांना जंगल सफारी करण्याची हौस असते. मात्र, हीच जंगल सफारी एकासाठी चांगलीच अडचण घेऊन आली. साप चावल्याने पर्यटकाला आपल्या प्रायवेट पार्टला गमवावे लागले.

नेदरलँडचा ४७ वर्षीय पर्यटक दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात फिरण्यासाठी आला होता. निसर्ग अभयारण्याला भेट देत असताना त्याला शौच लागली. यामुळे तो पर्यटक जंगलाच्या मध्यभागी बांधलेल्या शौचालयात गेला. दरम्यान, कमोडमध्ये आधीपासूनच असलेल्या विषारी कोब्राने पर्यटकाच्या लिंगालाच चावा घेतला. पर्यटकाने आरडाओरड केल्यानंतर जंगल सफारीचे रक्षक आणि इतर कर्मचारी मदतीसाठी धावून आले.

हेही वाचा: शवगृहात १०० मृत महिलांशी शारीरिक संबंध; बनवले व्हिडिओ

यानंतर पर्यटकाला तातडीने जवळच्या रुग्णालयाला हेलिकॉप्टरने पाठवण्यात आले. मात्र, हेलिकॉप्टरसाठी पर्यटकांना तीन तास वाट पाहावी लागली. साप चावल्यानंतर पर्यटकाला लिंगात जळजळ जाणवत होती. थोड्याच वेळात त्याचे लिंग फुगले आणि निळा झाला. हळूहळू त्या व्यक्तीच्या लिंगाचे आणि आजूबाजूच्या भागांचे मांस वितळू लागले. सापाचे विष इतके प्रबळ होते की डॉक्टराला पर्यटकाचे लिंग कापावे लागले. विषामुळे लिंग कुजले होते. ते कापण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नऊ दिवसांच्या उपचारानंतर पर्यटकाला नेदरलँडला परत पाठवण्यात आले. डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या कंबरेतून काढलेल्या टिश्यूच्या मदतीने पुरुषाच्या लिंगाची बरीच दुरुस्ती केली. तेव्हापासून, त्या व्यक्तीने आफ्रिकन देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना एका संदेशाद्वारे सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: Jungle Safari South Africa Cobra Bite Penis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top