Suicide attack : काबूलमध्ये आत्मघाती हल्ला; तालिबानचा रहीमुल्लाह हक्कानी ठार

Kabul Attack News
Kabul Attack NewsKabul Attack News

Kabul Attack News तालिबानचा रहिमुल्लाह हक्कानी (Rahimullah Haqqani) काबूलमध्ये (Kabul) आत्मघातकी हल्ल्यात ठार (Death) झाला आहे. हा आत्मघाती हल्ला झाला तेव्हा हक्कानी काबूलमधील मदरशात हदीस वाचत होता, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र, तालिबानने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

रहिमुल्लाह हक्कानी याला ठार (Death) मारण्याचा कट रचण्यात आला होता. याअंतर्गत हा आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात रहिमुल्लाह हक्कानीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रहिमुल्लाचा मृत्यू अंतर्गत वैमनस्यातून झाला की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

Kabul Attack News
Boat Sank : उत्तर प्रदेशात मोठा अपघात; यमुनेत ३० जण बुडाले, चौघांचे मृतदेह सापडले

रहिमुल्लाह हक्कानीवर यापूर्वीही हल्ला झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर हा हल्ला ऑक्टोबर २०२० मध्ये झाला होता. हक्कानीवर तिसऱ्यांदा हल्ला झाला. २०१३ मध्ये पेशावरच्या रिंग रोडवर त्याच्या ताफ्यावर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता. परंतु, तो सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

या हल्ल्यांसाठी हक्कानीने ख्वारिज घटकांवर बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप केला होता. शेख रहीमुल्लाह हक्कानी हा पाकिस्तान (Pakistan) सीमेजवळील नांगरहार प्रांतातील पचिर अव आगम जिल्ह्यातील रहिवासी होता. हक्कानी हादीसमध्ये पारंगत होता. त्याने स्वाबी आणि अकोरा खट्टक येथील देवबंदी मदरशांमधून शिक्षण पूर्ण केले.

Kabul Attack News
भाजप नेत्याचा चक्क अभिनेत्याला सल्ला; आमिर खान, बॉलिवूडला उद्देशून म्हणाले...

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रहिमुल्लाह हक्कानी नऊ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये राहत होता. त्याने काही वर्षांपूर्वी मदरसा झुबेरीची स्थापना केली होती. जिथे शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. रहिमुल्लाह हक्कानीचे फेसबुक पेजही होते जिथे तो हदीसबद्दल बोलत असे. त्यांचे एक यूट्यूब चॅनेल देखील होते. जिथे त्याने हदीस, हनाफी आणि देवबंदीचा ठळकपणे प्रचार केला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये त्यांचे बरेच अनुयायी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com