कराची व लाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे;आयक्यूएअर’च्या यादीत कोलकत्याचाही समावेश 

एएनआय
Wednesday, 16 December 2020

सिंध प्रांतातील प्रमुख शहर असलेल्या लाहोरचा क्रमांक या यादीत सहावा असून पंजाब प्रांतातील कराची चौथ्या क्रमांकावर आहे. मंगोलियाच्या उलनबटर या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

इस्लामाबाद - जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांमध्ये कराची व लाहोर यांचे नाव पुन्हा एकदा आले आहे. हवेच्या गुणवत्तेची माहिती देणाऱ्या ‘आयक्यूएअर’ या संकेतस्‍थळावर ही माहिती देण्यात आली आहे. 

सिंध प्रांतातील प्रमुख शहर असलेल्या लाहोरचा क्रमांक या यादीत सहावा असून पंजाब प्रांतातील कराची चौथ्या क्रमांकावर आहे. मंगोलियाच्या उलनबटर या यादीत पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेशमधील ढाका आणि कझाकिस्तानमधील बिश्‍केक हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे, असे वृत्त ‘द न्यूज इंटरनॅशनल’ने दिले आहे. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थे (यूएसइपीए)च्या निकषानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ५० पेक्षा कमी असल्यास हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे मानले जाते. कराची व लाहोरचा ‘पीएम’ (सूक्ष्म धूलिकण) अनुक्रमे १८३ आणि १७० असल्याची नोंद झाली असून हे प्रमाण आरोग्याला हानिकारक समजले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंजाब प्रांतातील विभागीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (पीडीएमए) वातावरणातील धुरके कमी होण्यासाठी एक हजार ७१८ वीटभट्ट्या, दोन हजार ६५८ उद्योग काही दिवस बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. ११ हजार ७८२ वाहनेही जप्त केली आहेत. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रांतीय सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या ५४४ जणांना ‘पीडीएमए’ने अटक केली होती. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोलकताही प्रदूषित 
‘आयक्यूएअर’च्या संकेतस्‍थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांमध्ये भारतातील कोलकताचाही समावेश आहे. कोलकताचा सातवा क्रमांक असून याचा ‘एक्यूआय’ १६२ आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वांत प्रदूषित दहा शहरे व त्यांचा ‘एक्यूआय’ 
१) उलनबटोर (मंगोलिया) - २६४ 
२) ढाका (बांगलादेश) - २४३ 
३) बिश्‍केक (कझाकिस्तान) - २३४ 
४) कराची (पाकिस्तान) -१८३ 
५) बँकॉक (थायलंड) - १७१ 
६) लाहोर (पाकिस्तान) - १७० 
७) कोलकता (भारत) - १६६ 
८) काठमंडू (नेपाळ) - १६५ 
९) मिलानो (इटली) - १६३ 
१०) तेहरान (इराण) - १५७ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karachi and Lahore named among the top ten most polluted cities in the world