काश्मीरवरून लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयावर दगडफेक

वृत्तसंस्था
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

ब्रिटनच्या संसदेच्या आवारात असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयावर ब्रिटीश काश्मिरी ग्रुपकडून मोर्चा काढण्यात आला होता. ब्रिटीनमधील लेबर ग्रुपच्या काही खासदारांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील, खलिस्तानवादी आणि इतर गटाचे नागरिक सहभागी झाले होते.

लंडन : लंडनमध्ये ब्रिटीश-पाकिस्तानी नागरिकांकडून निदर्शने सुरुच असून, आठवड्यात दुसऱ्यांदा नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसले. यावेळी निदर्शकांनी भारतीय उच्चायुक्तालयावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

ब्रिटनच्या संसदेच्या आवारात असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयावर ब्रिटीश काश्मिरी ग्रुपकडून मोर्चा काढण्यात आला होता. ब्रिटीनमधील लेबर ग्रुपच्या काही खासदारांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील, खलिस्तानवादी आणि इतर गटाचे नागरिक सहभागी झाले होते. काश्मीरवरचे हल्ले थांबवा, येथील बंधने हटवा, संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरप्रश्नी मार्ग काढावा, काश्मीरमधील युद्ध बंद करा, काश्मीरला स्वतंत्र दर्जा द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या मार्चचे नेतृत्व करणारे खासदार लियाम बार्यन म्हणाले, की काश्मीरमधील प्रश्नाविषयी नागरिक शांत बसू शकत नाहीत. काश्मीरमधील नागरिकांना संयुक्त राष्ट्रांकडून न्याय मिळेपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरत राहू. द्विपक्षीय चर्चा हा आता मार्ग राहिलेला नाही, सर्वांनी मिळून निर्णय घ्यायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kashmir protests get ugly again in London Indian High Commission targeted