Khaby Lame : प्रसिद्ध टिकटॉकर खॅबीला अखेर मिळाले इटालियन नागरिकत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

khaby Lame

Khaby Lame : प्रसिद्ध टिकटॉकर खॅबीला अखेर मिळाले इटालियन नागरिकत्व

रोम : लॉकडाऊनमध्ये प्रसिद्ध झालेला टिकटॉकर खॅबी आपल्या सर्वांना माहिती असेल. रोजच्या जगण्यातल्या सोप्या गोष्टीच्या व्हिडिओमुळे तो सध्या प्रसिद्ध असून टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर सर्वांत जास्त फॉलोवर्स असणाऱ्या दिग्गजांच्या यादीत त्याचा नंबर लागतो. अशा जगप्रसिद्ध टिकटॉकर खॅबी लेम याला अखेर इटालियन नागरिकत्व मिळाले आहे. खबाने सेरिग्ने लेम असं त्याचं संपूर्ण नाव असून तो तब्बल २२ वर्षापासून ईटली मध्ये राहत आहे.

( Tiktoker Khaby Lame Get Italian Citizenship)

खॅबी हा मुळचा सेनेगलमधील असून तो २२ वर्षापूर्वी इटलीला स्थायिक झाला होता. पण तेथील कठोर कायद्यामुळे त्याला आत्तापर्यंत नागरिकत्व मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. तो टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर फेमस होऊ लागल्यावर इटालियन गृह मंत्रालयाने जूनमध्ये त्याच्या नागरिकत्वासाठीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्याला अखेर इटालियन नागरिकत्व मिळाले. "मी देशाशी प्रामाणिक राहण्याची आणि राज्यघटना, राज्याचे कायदे पाळण्याची शपथ घेतो," अशी शपथ लेम याने घेतली.

हेही वाचा: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; दोन किमी वाहनांच्या रांगा

दरम्यान, कोरोना काळात कारखान्यातील नोकरी गमावल्यानंतर 2020 मध्ये खॅबी लेमने आपला टिकटॉक प्रवास सुरू केला. यामध्ये त्याला यश मिळाले आणि दोन वर्षात त्याने टिकटॉकवर 148 दशलक्ष फॉलोअर्स मिळवले आहेत. इटलीच्या नागरिकत्वाची शपथ घेतल्यानंतर लेम म्हणाला की, मला या नागरिकत्वाचा खूप अभिमान वाटला आणि मी घेतलेल्या शपथेची ही मोठी जबाबदारी असल्याचं त्याने सांगितलं.

Web Title: Khaby Lame Get Italian Citizenship After 22 Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsItaly