
किम जोंग उन करणार अण्वस्त्र हल्ला?; लष्कराला दिला इशारा
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आपल्या क्रौर्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून दक्षिण कोरियासोबत असलेल्या प्रखऱ शत्रुत्वामुळे त्याची जगभरात चर्चा आहे. किम जोंग उन यांच्या अण्वस्त्र हल्ल्याची टांगती तलवार कित्येक वर्षांपासून आहे. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा दिला आहे.
किम जोंग उन यांनी इशारा दिला आहे की जर उत्तर कोरियाला धोका असल्याचं वाटलं तर आपण अण्वस्त्रांचा वापर करू. प्योनग्यांग मध्ये झालेल्या लष्करी परेडनंतर किम जोंग उन यांनी आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचं कौतुकही केलं. किम यांनी आपल्या अण्वस्त्र सज्ज लष्कराचा सातत्याने विकास करण्याची प्रबळ इच्छाही यावेळी व्यक्त केली. बाहेरून जर उत्तर कोरियाला कोणत्याही प्रकारचा धोका असल्याचं समोर आलं तर आपण गरज पडल्यास अण्वस्त्रांचा वापर करू असा इशाराच किम जोंग उन यांनी दिला आहे.
उत्तर कोरियाच्या लष्कराच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त परेडचं आय़ोजन करण्यात आलं होतं. यावेळी किम यांनी आपल्या सैन्याची अण्वस्त्र शक्ती शक्य तितक्या वेगाने विकसित करण्याची आणि भाग पाडल्यास त्याचा उपयोगही करण्याची शपथ घेतली.
Web Title: Kim Jong Unn Warns North Korea Would Use Nuclear Weapons If Necessary
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..