जगात भारी कोल्हापुरी! लीना नायर बनल्या फ्रान्सच्या Chanel कंपनीच्या CEO

विशेष म्हणजे भारतीय वंशाच्या असलेल्या लीना नायर यांचे महाराष्ट्रातील कोल्हापूरशी कनेक्शन आहे.
Leena Nair
Leena Nair

भारतीय वंशाच्या लीना नायर (Leena Nair) यांच्या फ्रान्समधील लग्झरी ग्रुप Chanel च्या CEO पदी नियुक्ती झाली आहे. Chanel ही प्रसिद्ध अशी फॅशन कंपनी (Fashion company) आहे. याआधी लीना नायर या युनिलवरसोबत काम करत होत्या. विशेष म्हणजे भारतीय वंशाच्या असलेल्या लीना नायर यांचे महाराष्ट्रातील कोल्हापूरशी कनेक्शन आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापुरातील होलिक्रॉस स्कूलमध्ये (holy cross school) झाले आहे.

लीना नायर फ्रान्सच्या दिग्गज कंपनीच्या CEO झाल्यानंतर पुन्हा एकदा जगात भारतीयांचा डंका वाजला आहे. काही दिवसांपूर्वी ट्विवटरच्या सीईओपदाची धुरा भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांच्याकडे आली होती. याशिवाय मायक्रोसॉफ्ट, गुगल, अडोब, आयबीएम यांसारख्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. आता लीना यांचाही समावेश या दिग्गजांच्या यादीत झाला आहे.

Leena Nair
Miss Universe 2021: हरनाज संधूच्या 'या' उत्तराने जिंकली परीक्षकांची मनं

कंपनीच्या सीईओ पदी नियुक्तीनंतर लीना नायर यांनी ट्विटरवर आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, माझा गौरव झाल्याचं वाटत आहे आणि Chanel सोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. लीना नायर या याआधी युनिलिव्हरमध्ये प्रमुख एचआर अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. त्या पदाचा राजीनामा दिला असून जानेवारीमध्ये Chanel कंपनीत त्या रुजू होणार आहेत. Chanel कंपनी त्यांच्या क्विल्टेड हँडबॅग, ट्विड सूट आणि no.5 परफ्युम या उत्पादनांसाठी ओळखली जाते.

महाराष्ट्रातील कोल्हापुरच्या असलेल्या लीना नायर यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापुरातील होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. त्यानंतर सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पुढच्या शिक्षणासाठी त्या जमशेदपूरला गेल्या. तिथे झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. एमबीएमध्ये त्या गोल्ड मेडलिस्ट होत्या. १९९२ मध्ये लीना नायर यांनी युनिलिव्हरमध्ये काम सुरु केलं होतं. त्यांनी कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करत करत २०१६ मध्ये प्रमुख एचआर अधिकारी पदापर्यंत मजल मारली होती. लीना या युनिलिव्हरमध्ये सर्वात कमी वयाची आणि पहिली महिला, पहिली आशियाई CHRO ठरल्या होत्या.

Leena Nair
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं; सख्खे 4 भाऊ 'आमदार'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com