Iran Crisis : इराणमधून बाहेर पडण्यासाठी ‘अग्निपरीक्षा’; भारतीय पर्यटकाचा ५०० किमीचा धोकादायक प्रवास
Back To India : इराणमधील अस्थिरतेमुळे कोलकत्यातील प्राध्यापक फाल्गुनी डे यांनी तेहरानहून ५०० किमी प्रवास करत अस्तारा सीमा गाठली. मात्र, अझरबैजानमध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांअभावी ते अडकले आहेत.
कोलकता : इराणमधील भारतीय पर्यटक बाहेर पडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. राजधानी तेहरानपासून रस्तामार्गे ५०० किमीचा धोकादायक प्रवास केल्यानंतर फाल्गुनी डे या भारतीय पर्यटकाने इराणची अझरबैजानला लागून असलेली अस्तारा ही सीमा गाठली.