
आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी याला वानुआतू सरकारने नागरिकत्व नाकारल्यानंतर, त्यांनी या देशाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तेथे राहण्याचा अनुभव 'स्वर्गीय' असल्याचे म्हटले आहे. भारतातील कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी मोदीवर कोट्यवधींच्या अपहाराचे आरोप आहेत. त्यांनी २०१० मध्ये भारत सोडले आणि लंडनमध्ये स्थायिक झाले. मात्र, आता वानुआतू सरकारने त्याचे नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.