Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Lalit Modi and Vijay Mallya London Party Video - या पार्टीत वेस्टइंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल याच्यासह तीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी हजेरी लावली होती.
Lalit Modi  and Vijay Mallya London Party Video
Lalit Modi and Vijay Mallya London Party Videoesakal
Updated on

Lalit Modi and Vijay Mallya Spotted Partying in London - भारतात घोटाळे करून पसार झालेल्या ललित मोदी आणि विजय मल्ल्या या दोघांचा लंडनमधील एका पार्टीतील मजा-मस्तीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून मोठ्याने गाणे गाताना दिसत आहेत. तसेच याप्रसंगी पार्टीत उपस्थित अन्य जणही त्यांच्यासोबत या गाण्याचा आनंद घेताना व्हिडिओत दिसत आहेत.

विशेष म्हणजे हा व्हिडिओ स्वतः ललित मोदीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर तो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. या पार्टीत वेस्टइंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल याच्यासह तीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी हजेरी लावली होती.

आयपीएलमध्ये आर्थिक अनियमिततेच्या आरोपानंतर 2010 मध्ये भारत सोडून गेलेला ललित मोदी. फेमा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये भारतात हवा आहे. तर विजय मल्ल्या 2016 मध्ये भारत सोडून गेला. त्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्स दिवाळखोरीत निघाली आहे. शिवाय, त्याच्यावर बँक फसवणूक आणि 900 कोटी रुपयांच्या आयडीबीआय कर्जाचा आरोप आहे. भारताने दोघांच्याही प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, परंतु ते अजूनही ब्रिटनमध्ये कायदेशीर आश्रय घेऊन मजेत जीवन जगताना दिसत आहेत. या दोघांनाही भारतात फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे.

Lalit Modi  and Vijay Mallya London Party Video
Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

खरंतर, काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने दिवाळखोरीच्या आदेशाविरुद्ध मल्ल्याची अपील फेटाळली होती. तर ललित मोदी म्हणाला आहे की, त्याच्याविरुद्धचे खटले राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. विजय मल्ल्याने सोशल मीडियावर दावा केला की माझी १४,१३१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, जी माझ्यावरील थकित कर्जापेक्षा खूप जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com