लॅटिन अमेरिकेत कोरोनाचा धुमाकूळ, मृत्यूंची संख्या दीड कोटींवर

ब्राझीलने शुक्रवारी 600,000 मृत्यूंचा आकडा ओलांडल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
Corona Patients
Corona PatientsSakal
Updated on

जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि भारताला बसल्याचं चित्र आहे. मात्र, मुबलक लसीकरणामुळे आणि पायाभूत वैद्यकीय सेवांमुळे अमेरिकेतील दुसरी लाट थोपवण्यावर सरकारला यश आलं. भारतात दुसऱ्या लाटेने सर्वाधिक हाहाकार माजवला. मात्र आता कोरोनाचे आकडे कमी होत असल्याचं दिसतं.

लसीकरणावर भर दिल्याने भारतातही महामारीचा प्रभाव कमी होत आहे. मात्र, लॅटिन अमेरिकन देशांमध्ये अद्याप परिस्थिती नियंत्रणात नाही. ब्राझीलने शुक्रवारी 600,000 मृत्यूंचा आकडा ओलांडल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. 213 दशलक्ष नागरिकांच्या देशात 21.5 दशलक्ष नागरिक आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात आले आहेत.

जेव्हा लॅटिन अमेरिकेतील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 1.5 दशलक्षांच्या पुढे गेली आहे. ब्राझील हा अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मृत्यूच्या बाबतीत ब्राझीलनंतर मेक्सिको, पेरू, कोलंबिया आणि अर्जेंटिनाचा क्रमांक लागतो.

आत्तापर्यंत, ब्राझीलमधील 71.4 टक्के लोकांना किमान एका लशीचा डोस मिळाला आहे. परंतु केवळ 45.9 टक्के पूर्ण लसीकरण झाले आहे. ब्राझीलचा लसीकरण कार्यक्रम अर्जेंटिना आणि अमेरिकेच्या काही आठवड्यांनंतर जानेवारीच्या अखेरीस सुरू झाला. तज्ञांनी सरकारी नियोजनाचा अभाव असल्याचा ठपका ठेवला आहे.

मात्र, तीन महिन्यांपूर्वी परिस्थिती सुधारली आहे. यापूर्वी, दिवसाला 2,000 ब्राझिलियन नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. हा मृत्यू दर जुलैच्या अखेरीस 1000 च्या खाली आला आणि सप्टेंबरमध्ये 500 च्या आसपास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com