Global News : हेल्मेटसक्ती विरोधात लढणाऱ्या वकिलाचा हेल्मेट न घातल्यानेच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two wheeler rider wearing helmet
Global News : हेल्मेटसक्ती विरोधात लढणाऱ्या वकिलाचा हेल्मेट न घातल्यानेच मृत्यू

Global News : हेल्मेटसक्ती विरोधात लढणाऱ्या वकिलाचा हेल्मेट न घातल्यानेच मृत्यू

फ्लोरिडामध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे आवश्यक करणाऱ्या कायद्यांविरुद्ध आयुष्यभर लढा देणाऱ्या वकिलाचा हेल्मेट नसल्याने अपघातात मृत्यू झाला.या घटनेमुळे पुन्हा एकदा हेल्मेटचं महत्त्व अधोरेखित होत आहे. सातत्याने जगभरासह आपल्या देशातही हेल्मेट घालण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे.

हेही वाचा: Pune Crime : धक्कादायक! लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मुलाची सख्ख्या आईला अमानुष मारहाण

रॉन स्मिथ असं या ६६ वर्षीय वकिलाचं नाव आहे. रॉन एका दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या अंत्यविधीला निघाला होता. त्यावेळी त्याला रस्त्यात जरा ट्रॅफिक लागलं, त्यामुळे त्याने गाडीचा वेग कमी केला आणि त्यावेळी त्याच्या गाडीचा अपघात झाला. त्याची ६२ वर्षीय गर्लफ्रेंड ब्रेंडा जीनन वोल्प हीसुद्धा त्याच्यासोबतच होती. तिचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या दोघांनीही गाडी चालवताना हेल्मेट घातलेलं नव्हतं.

रॉन ब्रदरहुड अगेन्स्ट टोटॅलिटेरियन एनॅक्टमेंट्सचा सदस्य होता. त्याने ज्यांनी फ्लोरिडाचे मोटरसायकल नियम मोडले अशा नागरिकांची कोर्टात बाजू मांडली होती. त्याने 2000 मध्ये राज्याची हेल्मेटची सक्ती उलथून टाकण्यास मदत केली असे काहींचे म्हणणे आहे. रॉनला सतत वाटायचं की प्रत्येकाला स्वतःची आवडनिवड असते, असं त्याचा मित्र डेव्ह न्यूमन यांनी सांगितलं.

टॅग्स :global news