कॅनडात गोळीबारात १६ जणांचा मृत्यू

पीटीआय
Tuesday, 21 April 2020

कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया प्रांतामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या वेशातील बंदूकधारी व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या प्रतिकारात हा हल्लेखोर मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टोरंटो - कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया प्रांतामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या वेशातील बंदूकधारी व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या प्रतिकारात हा हल्लेखोर मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॅनडातील हॅलिफाक्सच्या उत्तरेस १०० किलोमीटर वर असणाऱ्या पोर्टॅपिकमधील एका घरामध्ये आणि घराच्या बाहेरील परिसरात अनेक मृतदेह सापडले आहेत. तर, काही मृतदेह घरापासून नजीकच्या अंतरावरही सापडली आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या 30 वर्षातील कॅनडामधील सर्वात प्राणघातक हल्ला म्हणून याचे वर्णन केले गेले आहे.

गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून गॅब्रिएल वॉर्टमन (वय ५१) असे त्याचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून पोर्टेपिकमध्ये राहत होता. वॉर्टमनने चेक पॉइंटवर पोलिसांचा गणवेश घातला होता आणि आपली कार रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस कारसारखी बनविली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वॉर्टमनने सर्वप्रथम रात्री ११.३० च्या सुमारास गोळीबार केला. त्यानंतर तब्बल १२ तासांनी स्थानिक पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At least 16 people have been killed in a shooting in Canada