Christchurch Mosque Shooting : न्यूझीलंडमध्ये लाईव्ह करत गोळीबार; 40 मृत्यूमुखी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 मार्च 2019

न्यूझीलंड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात असून, त्यात 1 महिला तर 3 पुरुषांचा समावेश आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केलं होतं. यानंतर अजून एका मशिदीत गोळीबार करण्यात आला होता.

वेलिंग्टनः न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. हल्लेखोरांनी काळे कपडे परिधान केले होते. न्यूझीलंडच्या पोलिसांनी हल्लेखोर गोळीबार करत असलेल्या परिसराला चारही बाजूंनी घेरलं आहे.

न्यूझीलंड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात असून, त्यात 1 महिला तर 3 पुरुषांचा समावेश आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केलं होतं. यानंतर अजून एका मशिदीत गोळीबार करण्यात आला होता.

न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदाधूंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. संघातील सर्व खेळाडू मशिदीच्या आत जाणार तेवढ्यात गोळीबाराला सुरवात झाली अशी माहिती बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रवक्ते जलाल युनूस यांनी दिली. तसेच संघातील सर्व खेळाडू सुखरूप आहेत मात्र, त्यांना मोठा धक्का बसला असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमिवर न्यूझीलंड आणि बागंलादेश यांच्यात हेग्ली ओव्हल येथे होणारा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे.

गोळीबारात पूर्ण बांगलादेशची टीम थोडक्यात बचावली आहे. हा फारच भीतीदायक अनुभव असल्याचंही तमीम इक्बालनं सांगितलं आहे. खेळाडू बसमधून उतरून मशिदीत जाणार होते, त्याचदरम्यान हा गोळीबार झाला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होते तेव्हा हा गोळीबार करण्यात आला, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिली. सेंट्रल ख्राइस्टचर्चच्या प्रशासनानं लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At least 40 dead as gunman opens fire in Christchurch mosques in new zealand