डावखुरे लोक बोलण्यात अधिक पटाईत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

ही माहिती जगातील प्रख्यात ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आला आहे.

लंडन : पूर्वीच्या काळात डावखु-या व्यक्तींबद्दल समाजाची विचारसरणी अत्यंत वेगळी, त्यामुळे डाव्या हाताने लिहिणाऱ्या किंवा कोणतेही काम करणाऱ्या व्यक्तीला त्याचे पालक किंवा शिक्षक उजव्या हाताने काम करायला लावत, मात्र सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात डावखुऱ्या व्यक्तींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

उजव्या हाताने काम करणारऱ्या व्यक्तींपेक्षा डावखुरी व्यक्ती या बोलण्यात अधिक पटाईत असतात. असा निष्कर्ष जगातील प्रख्यात ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आला आहे.

ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 4 लाख लोकांच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. तसेच एखादा व्यक्ती डावखुरा म्हणून का जन्माला येतो, याबद्दल देखील शास्त्रीय अभ्यास सुरू असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

जगातील काही प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्ती 

लिओनल मेस्सी (प्रसिद्ध फुटबॉलपटू) 

सौरव गांगुली (प्रसिद्ध क्रिकेटपटू) 

बील गेट्‌स (माक्रोसॉफ्टचे संस्थापक) 

बराक ओबामा (अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष) 

लिओनार्डो दा विन्सी (प्रसिद्ध चित्रकार) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: left handers are more powerfull in verbal tasks than right handers