काबूलवरील हल्ल्याचा बदला घेऊ; ज्यो बायडेन

अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनंतर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Joe Biden
Joe BidenSakal

वॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील (Afghanistan) काबूल विमानतळाबाहेर (Kabul Airport) दहशतवाद्यांनी (Terrorist) घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनंतर (Bombblast) अमेरिकेने (America) आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी आज हल्लेखोर दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना याची जबर किंमत मोजायला भाग पाडू असा इशारा दिला आहे.

बायडेन म्हणाले, की ‘हा हल्ला घडवून आणणारे आणि अमेरिकेला इजा पोचवू पाहणाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही. हा हल्ला आम्ही कधीच विसरू शकत नाहीत. आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्याची जबर किंमत मोजायला भाग पाडू. आम्ही आमचे हित आणि लोकांचे संरक्षण करू.’ या दहशतवादी हल्ल्यांमागे ‘इसीस’चा हात असल्याचा दावाही बायडेन यांनी केला आहे. अशाप्रकारचे हल्ले होऊ शकतात याची भीती आम्हाला पूर्वीपासून वाटत होती. गुप्तचरसंस्थांनी तसा इशारा देखील दिला होता. विमानतळाबाहेर उभे असलेल्या अमेरिकी सुरक्षारक्षकांचा त्यांनी जीव घेतला असून अनेकजणांना गंभीररीत्या जखमी केले आहे. अनेक नागरिक यात मरण पावले असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. ‘इसीस’ची संपत्ती, त्यांचे नेतृत्व आणि केंद्रांना लक्ष्य करण्याचा आराखडा लष्करी अधिकाऱ्यांनी तयार करावा, असे आदेशही बायडेन यांनी दिले.

Joe Biden
तालिबाननं काश्मीर प्रश्नावर पाजळलं ज्ञान; भारताला दिला सल्ला

सुटका मोहीम पूर्ण करूच

अफगाणिस्तानातील अमेरिकी नागरिकांची सुटका मोहीम कायम राहणार असून ३१ ऑगस्टपर्यंत ती पूर्ण करण्याचे आमचे नियोजन असल्याचेही बायडेन यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ही मोहीम ठरलेल्या वेळेच्या आत पूर्ण करू. आम्ही दहशतवाद्यांना घाबरणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मोहीम थांबविणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते तालिबानच्याच फायद्याचे

‘इसीस’ या दहशतवादी संघटनेमध्ये फारसा बदल झालेला नसून ही बाब सध्या अफगाणिस्तानचे शासक बनलेल्या तालिबान्यांच्या पथ्यावर पडणारी असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. तालिबान आणि इसीस यांच्या विचारसरणीमध्ये फरक असून काबूलमध्ये विमानतळाबाहेर घडवून आणण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये या दोन्ही संघटनांचा हात असल्याचा दर्शविणारे कोणतेही पुरावे अद्याप समोर आले नसल्याचे त्यांनी सांगितले. योग्यवेळी अफगाणिस्तानातून माघार घेणे हे अमेरिकेच्या हिताचे असून तालिबान्यांवर कोणीही विश्‍वास ठेवू शकत नाही. ट्रम्प यांच्या काळात तालिबान्यांचा अमेरिकेशी करार झाला होता त्यामुळे मागील वर्षभरात आमच्या सैनिकांवर हल्ला करण्यात आलेला नाही, असेही बायडेन यांनी नमूद केले.

Joe Biden
काबुल एअरपोर्टवर पाणी बॉटल 3000, तर राईस प्लेट 7500 रूपये

दहशतवादाविरोधात एक व्हा - भारत

काबूलमधील बाँबस्फोटांचा आज भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तीव्र निषेध केला. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा जगाने दहशतवाद्यांविरोधात एकत्र येण्याची गरज अधोरेखित झाली असून दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधात देखील आपण एकजूट दाखवायला हवी असे मत भारताच्या प्रतिनिधींनी मांडले आहे. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी आणि सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष राजदूत टी.एस. तिरूमूर्ती म्हणाले, की ‘काबूलमधील दहशतवादी हल्ल्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्यांच्या दुखामध्ये आम्ही सहभागी आहोत.’ संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनीही माध्यमांशी बोलताना काबूलमधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com