
London Plane Crash Details of the Tragic Incident: लंडनच्या साउथेंड विमानतळावरून रविवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच एका लहान प्रवासी विमानाचा मोठा अपघात झाला. अचानक स्फोट झाल्याने विमानाला आग लागली आणि घटनास्थळी काळ्या धूराचे मोठे लोट आकाशात जाताना दिसत होते.
स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान बीच बी२०० सुपर किंग एअर, एक ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप जेट होते आणि ते नेदरलँड्समधील लेलिस्टॅडला जात होते.
घटनेनंतर लगेचच आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आल्या. पोलिस, अग्निशमन दल आणि मदत पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. विमानात किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रत्यक्षदर्शींनी अपघाताचे वर्णन "अतिशय भयानक आणि दुःखद" असं केले. तसेच असेही सांगितले की, अपघाताच्या काही क्षण आधी काही लोकांनी विमानातील कर्मचाऱ्यांना हात हलवून प्रतिसाद दिला होता.
याबाबत स्थानि पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे की, "साउथेंड विमानतळावर झालेल्या गंभीर घटनेनंतर पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत. आपत्कालीन कारवाई अनेक तास सुरू राहील. बचावकार्यादरम्यान लोकांना त्या भागापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.