दीर्घकाळ बसण्याने अकाली मृत्यूचा धोका 

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जानेवारी 2019

वॉशिंग्टन : सतत बसून राहण्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. त्यामुळे बैठे काम करताना काही ठराविक वेळी उठून शारीरिक हालचाली करणे आवश्‍यक आहे. असे केल्याने वृद्धापकाळात अकाली मृत्यूचा धोका 36 टक्‍क्‍यांने कमी होतो, असा निष्कर्ष "अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमिलॉजी' या ऑनलाइन प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकातील संशोधनपर लेखात मांडला आहे. 

आरोग्यदायी आयुष्यासाठी शरीराची सतत हालचाल होणे महत्त्वाचे आहे. हालचालींचे प्रमाण व वेळ याचा विचार न करता यावर भर देणे आवश्‍यक आहे, असे या लेखात म्हटले आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या "व्हॅगेलॉस कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स'मधील वर्तणूक वैद्यकीय विभागाचे सहप्राध्यापक किथ दियाझ म्हणाले की, कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असा सार्वजनिक आरोग्याच्या हिताचा संदेश आम्ही यातून दिला आहे.

चारपैकी एक प्रौढ व्यक्ती साधारण दररोज आठ तास बसत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. जे प्रौढ एकाच ठिकाणी जास्त वेळ बसते त्यांना अकाली मृत्यूचा धोका जास्त असतो. या उलट जे जास्त वेळ बसतात, पण अधूनमधून उठून आसपास फिरतात त्यांच्यात हे प्रमाण कमी असते, असे दियाझ यांनी सांगितले. 

बैठे काम करणाऱ्यांना सल्ला 

जे लोक एका जागी 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ बसतात, त्यांच्या अकाली मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी असते, असेही आढळून आले आहे. यासाठी जास्त वेळ बैठे काम करणाऱ्यांनी प्रत्येक अर्ध्या तासाने उठून थोडे फिरावे, असा सल्लाही लेखात दिला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Long Time Seating threats premature death