Look Back 2020: जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकाही भारतीयाला नाही स्थान

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 31 December 2020

कोरोना महामारीने थैमान घातले असले तरी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले

नवी दिल्ली- कोरोना महामारीने थैमान घातले असले तरी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ब्लुमबर्ग बिलीनियर इंडेक्सनुसार श्रीमंत व्यक्तींनी 2020 मध्ये तब्बल 1.3 ट्रिलियन डॉलरची कमाई केली आहे.

जर्गातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्ती-

1. जेफ बेझोस

अॅमेझॉनचे जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 187 बिलियन डॉलर आहे. अॅमेझॉनमध्ये बेझोस यांची 11 टक्के मालकी आहे.  2019 मध्ये त्यांना पत्नीला पोटगीसाठी काही रक्कम द्यावी लागली होती. 

2. इलोन मस्क

टेस्लाचे संस्थापक इलोन मस्क यांनी बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला. 49 वर्षाच्या इलोन मस्क यांची संपत्ती 167 बिलियन डॉलर आहे. 

3. बिल गेट्स

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे यावर्षी एका स्थानाने घसरुन तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. बिल गेट्स अनेक वर्षांपर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती  होते. 2017 मध्ये जेफ बेझोस यांनी त्यांना मागे टाकले. त्यांची एकूण संपत्ती 131 बिलियन डॉलर आहे.

4.बरनार्ड अरनॉल्ट

फ्रेन्च लक्झरी टायकून बरनार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती सुरुवातीच्या काही महिन्यात आक्रसली होती. पण 2020 च्या शेवटच्या महिन्यात त्यांची संपत्ती वाढली. त्यांची संपत्ती 110 बिलियन डॉलर आहे.  

5. मार्क झुकरबर्ग

फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग सर्वात कमी वयाचे सेंटीबिलिनीयर ( ज्यांची संपत्ती 100 बिलियन डॉलरच्या पुढे आहे) आहेत. त्यांची संपत्ती 105 बिलियन डॉलर आहे. 

6. वॉरेन बफेट

बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष वॉरेन बफेट एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांची संपत्ती 2020 मध्ये कमी झाली. त्यांची संपत्ती यावर्षी 4.09 बिलियन डॉलरने कमी झाली. त्यांची एकूण संपत्ती 85.2 बिलियन डॉलर आहे. 

7. लॅरी पेज

81.4 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज ब्लूमबर्ग इंडेक्सच्या यादीत सातव्या स्थानी आहेत. ते अल्फाबेटचे सह-संस्थापक आहेत. 

8. लॅरी इलिसन

सॉफ्टवेअर जायंट ओरॅकलचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक लॅरी इलिसन 79.7 बिलियन डॉलर संपत्तीसह जगातील आठवे श्रीमंत व्यक्ती आहेत. रेडवूड सिटीचा तिसरा भाग त्यांच्या ताब्यात आहे. टेस्लामध्येही त्यांचे शेअर आहेत.

9. स्टिव्ह बॅलेमर
 
मायक्रोसॉफ्टचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिव्ह बॅलेमर जगातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 79.1 बिलियन डॉलर आहे. लॉज एंजेलीसची क्लिपर्स बास्केटबॉल टीम त्यांच्या मालकीची आहे. बिल गेट्स यांनी 1980 साली त्यांना कर्मचारी म्हणून कामावर ठेवले होतं. 2000 मध्ये त्यांनी बिल गेट्स यांची जागा घेतली होती. 

10.सर्गे ब्रिन

78.8 बिलियन डॉलरसह सर्गे ब्रिन यांनी जगातील 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. ते अल्फाबेटचे सह-संस्थापक आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look Back 2020 Top 10 richest people in world in 2020