जागतिक दबावासमोर झुकला सौदी अरेबिया; 1001 दिवसांनंतर महिला कार्यकर्ती हथलौलची सुटका

hathloul
hathloul

रियाद : सौदी अरेबिया देशातील प्रमुख महिला ऍक्टीविस्ट लुजैन अल हथलौल हिला जेलमध्ये डांबल्यानंतर जवळपास तीन वर्षांनंतर आता सुटका केली गेली आहे. मानवाधिकाराचा मुद्दा उठवून सौदी अरेबियावर अमेरिकेसहित इतर अनेक देशांचा दबाव होता. याच दबावामुळे सौदी अरेबियाने हथलौलची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. या 31 वर्षीय महिला कार्यकर्तीला 2018 मध्ये अटक केली गेली होती. यानंतर सौदीच्या कोर्टाने तिला सहा वर्षांचा तुरुंगवास सुनावला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर या निर्णयावर टीकेची झोड उठल्यानंतर या कार्यकर्तीच्या शिक्षेत घट करण्यात आली. हथलौलने सौदी अरेबियामधील महिलांच्या ड्रायव्हिंगवर आणलेली बंदी हटवण्याबाबत आंदोलन केलं होतं. तिला दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत अटक करुन शिक्षा सुनावली गेली होती.  

राष्ट्रीय सुरक्षेला नुकसान पोहोचवण्याचा आरोप
हथलौल जेलमध्ये 1001 दिवस राहिली आहे. यामध्ये तिला शिक्षेच्या सुनावणी आधीच तुरुंगात अधिक रहावं लागलं आहे. त्यांच्यावर परिवर्तानासाठी आंदोलन करणे आणि परदेशी अजेंडा पुढे रेटण्याचा आरोप ठेवला गेला होता. हथलौलवर झालेल्या कारवाईला मानवाधिकार संघटनांनी आक्षेप घेतला आहे. तसेच हथलौलच्या परिवाराने आरोप केलाय की तुरुंगात तिला इलेक्ट्रीक शॉक देणे, लैंगिक शोषणासहित इतर अनेक यातना दिल्या गेल्या. मात्र, सौदीच्या अधिकाऱ्यांनी या आरोपांना झिडकारलं आहे.  

हथलौलच्या शिक्षेनंतर सौदीवर दबाव
हथलौल आणि इतर महिला कार्यकर्तींना जेलमध्ये डांबल्यानंतर सौदी अरेबियावर अमेरिकेचा दबाव होता. या महिन्याच्या सुरवातीलाच व्हाइट हाऊसने म्हटलं की राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना आशा आहे की,  सौदी अरेबिया आपल्या राजकीय कैद्यांना तसेच महिला कार्यकर्तींना मुक्त करत आपल्या मानवाधिकारामध्ये सुधारणा करेल. हथलौलवर सौदीच्या राजकीय व्यवस्थेमध्ये परिवर्तनाची मागणी करणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेला नुकसान पोहोचवण्यासारखे आरोप लावले गेले होते. त्यांच्यावर लगावलेल्या या आरोपांना यूएन मानवाधिकार आयोगाच्या विशेषज्ज्ञांनी बनावट आरोप म्हटलं होतं. या प्रकरणात सौदी अरेबियावर टीकेची झोड उठल्यानंतर कोर्टाने हथलौलच्या शिक्षेत दोन वर्ष दहा महिन्यांची घट केली होती.  

हेही वाचा - ट्विटरची अर्धवट बंदी; सरकार करु शकते कंपनी अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं सुटकेचं स्वागत
अमरिकेसहित जगभराताली देशांनी हथलौलच्या सुटकेचं स्वागत केलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी बुधवारी म्हटलं की, माझ्याजवळ एक चांगली बातमी आहे. सौदी अरेबियाने प्रमुख मानवाधिकार एक्टिव्हिस्टची सुटका केली आहे. ती महिलांच्या अधिकाराची लढाई लढणारी प्रमुख कार्यकर्ती आहेत. तिची सुटका एक योग्य पाऊल आहे. महिला ऍक्टीव्हिस्टची बहिण लीना अल हथलौलने म्हटलंय की तिची बहिण पूर्णपणे स्वतंत्र नाहीये. लीनाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com