
लूजैन यांना राज्याच्या विरोधात षड्यंत्र रचणे आणि विदेशी शक्तींसोबत हात मिळवणी करुन कट रचण्याच्या आरोपाखाली अटक केली गेली होती.
नवी दिल्ली : सौदी अरेबियामध्ये महिला अधिकारांची लढाई लढणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्तीला जवळपास 6 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. या कार्यकर्तीचं नाव लूजैन अल-हथलौल असं असून त्या 31 वर्षांच्या आहेत. लूजैन यांना 2018 मध्ये ताब्यात घेतलं होतं. आता त्यांना पाच वर्षे आठ महिन्यांची शिक्षा सुनावली गेली आहे. The Guardian ने दिलेल्या बातमीनुसार, लूजैन यांना किंगडमच्या विरोधात षड्यंत्र रचणे आणि विदेशी शक्तींसोबत हात मिळवणी करुन कट रचण्याच्या आरोपाखाली अटक केली गेली होती. यासंदर्भातच त्यांना कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
मात्र, कोर्टाने त्यांची शिक्षा 2 वर्षे आणि 10 महिन्यांनी कमी केली आहे. तसेच शिक्षा सुरु होण्याची तारीख मे 2018 केली आहे, जेंव्हा त्यांना अटक केली गेली होती. या परिस्थितीत लूजैन यांना आता फक्त तीन महिनेच शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणात सौदीच्या प्रॉसिक्यूटर्सवर लूजैन यांचा शारीरिक तसेच लैंगिक छळ करण्याचा आरोप लावला गेला होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टाने या आरोपांचे खंडन करुन म्हटलंय की या आरोपांमध्ये कसलेही तथ्य नाहीये.
हेही वाचा - चीनमध्ये पत्रकाराला शिक्षा! कारण वाचा सविस्तर
हे प्रकरण सौदी अरेबियाच्या प्रतिष्ठेसाठी जोखमीचे आहे. अमेरिकेत बायडन यांचं सरकार आल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण महत्त्वपूर्ण मानलं जातंय. जर लूजैन यांना मोठी शिक्षा सुनावली गेली तर दोन्ही देशांच्या संबंधात कडवटपणा येऊ शकतो. कारण लूजैन प्रकरणावरुन सौदी पहिल्यापासूनच आंतरराष्ट्रीय मंचावर निशाण्यावर राहिला आहे. या शिक्षेवरुन देखील सौदी अरेबियावर जगभरातून टीका करण्यात येत आहे.
UN ह्यूमन राइट्सने यावर ट्विट करत हे त्रासदायक असल्याचं म्हटलं आहे. तसेच आशा आहे की लूजैन यांना लवकरच मुक्त केलं जाईल, असंही म्हटलं आहे. Al-Jazeera ने दिलेल्या वृत्तानुसार, लूजैन यांनी बहिण लीना हथलौल यांनी म्हटलंय की, माझी बहिण दहशतवादी नाहीये. ती एक सामाजिक कार्यकर्ती आहे. ज्या सुधारणांसाठी मोहम्मद बिन सलमान आणि सौदी किंगडम