एलईटी, टीटीपीपासून अमेरिकेला धोका

पीटीआय
Saturday, 6 October 2018

वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दहशतवादविरोधी नवे धोरण तयार केले असून, कट्टरवादी इस्लामिक गटांकडून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात धोका असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे. पाकिस्तानातील लष्करे तोयबा (एलईटी) आणि तेहरिके तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांचाही या कट्टरवादी गटांमध्ये समावेश आहे. 

अल कायदा, इसिस यांच्यासह सुमारे डझनभर कट्टरवादी इस्लामिक गटांमुळे अमेरिकेला धोका असून, हे गट स्थानिक पातळीवर मोठ्या दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात आहेत. या दहशतवादी गटांपासून विदेशांतील अमेरिकी नागरिक आणि संस्थांना धोका निर्माण झाला आहे, असे "व्हाइट हाउस'ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण अहवालात स्पष्ट केले आहे. 

"बब्बर खालसा'ही धोकादायक 

बब्बर खालसा या शीख दहशतवादी संघटनेकडून अमेरिकेचे विदेशांतील नागरिक आणि संस्थांना धोका असल्याचे नमूद करत या संघटनेचा समावेश धोकादायक फुटीरवादी गटांमध्ये अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेशी संबंधित महत्त्वाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिकबाबींना "बब्बर खालसा'कडून लक्ष्य केले जाते. ही संघटना भारतात आणि इतरत्र निरपराध नागरिकांवर हल्ले करते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. "बब्बर खालसा' वर अमेरिका, कॅनडा आणि भारताने यापूर्वीच बंदी घातली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LT and TTP threat to the United States