कॅरेबियन समुद्रात 7.6 रिश्‍टर स्केलचा भूकंप

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जानेवारी 2018

होंडुरासच्या ताब्यातील एका दुर्गम बेटावर बसलेला भूकंपच्या धक्का उत्तर मध्य अमेरिकेत जाणवला. यात कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. मेक्‍सिकोतील बकलर सरोवरानजीक भूकंपाचे तीन धक्के जाणवल्याचे येथील पर्यटकांनी सांगितले. हादरे जाणवू लागल्याने होंडुरासच्या दक्षिण भागात राहणारे नागरिक घराबाहेर पळाले, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली

तेगुसिगल्पा (होंडुरास) - कॅरेबियन समुद्रात आज (मंगळवार) 7.6 रिश्‍टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचे हादरे होंडुरास, मेक्‍सिको आणि बेलिझ या देशांत बसले. मात्र यामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

होंडुरासच्या ताब्यातील एका दुर्गम बेटावर बसलेला भूकंपच्या धक्का उत्तर मध्य अमेरिकेत जाणवला. यात कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. मेक्‍सिकोतील बकलर सरोवरानजीक भूकंपाचे तीन धक्के जाणवल्याचे येथील पर्यटकांनी सांगितले. हादरे जाणवू लागल्याने होंडुरासच्या दक्षिण भागात राहणारे नागरिक घराबाहेर पळाले, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली.

भूकंपानंतर पोर्तुरिको आणि अेमेरिकेतील व्हर्जिन बेटांवर त्सुनामी येण्याचा इशारा "पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटर'ने सुरवातीस दिला होता. मात्र भूकंपानंतर दोन तासाने त्सुनामीचा धोका टळला असल्याचे या केंद्राने जाहीर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Magnitude 7.6 earthquake strikes Caribbean