कोरोना महामारी खरंच संपली का? चीनमध्ये दोन बाधित पत्रकारांचा मृत्यू : Covid19 in China | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China Covid

Covid19 in China: कोरोना महामारी खरंच संपली का? चीनमध्ये दोन बाधित पत्रकारांचा मृत्यू

Covid 19 in China: गेली दोन वर्षे जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना महामारीनं चीनमध्ये पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. चीनमधील ताज्या घटनेत दोन पत्रकारांचा कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा जगाची काळजी वाढली आहे. (Two Chinese journalists have died in capital Beijing in recent days due to COVID19)

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, राजधानी बीजिंगमध्ये राहणाऱ्या चीनच्या सरकारी माध्यमात काम करणाऱ्या दोन माजी पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. यासाठी वृत्तसंस्थेनं चीनच्या स्थानिक माध्यांचा हवाला दिला आहे. विशेष म्हणजे महामारीचे नियंत्रण नियम ७ डिसेंबर रोजी शिथिल केल्यानंतर कोरोनामुळेच या दोघांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Sushma Andhare Vs Sunita Andhale: सुषमा अंधारेंचा कीर्तनकार सुनिता अंधाळेंवर पलटवार; म्हणाल्या, स्वतःला...

यांग लिआंघुआ (वय ७४) या पिपल्स डेली या सरकारी माध्यमाचे माजी रिपोर्टर तर झोऊ झिचुन (वय ७७) या चायना युथ डेलीच्या संपादकांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी यांग यांचा १५ डिसेंबर २०२२ तर झोऊ यांचा ८ डिसेंबर २०२२ रोजी मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यांना कोविडची बाधा झाल्याचं मृत्यूनंतर समोर आलं आहे. याबाबतच वृत्त अर्थविषयक मासिक कायाक्झननं दिलं आहे.

हे ही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

चीनमध्ये ७ डिसेंबर २०२२ रोजी कोविडचे सर्व नियम शिथील करण्यात आले. तोपर्यंत एकाही मृत्यूची नोंद चीनच्या नॅशनल हेल्थ ऑथरिटीनं अधिकृतरित्या नोंदवलेली नव्हती. यापूर्वी ३ डिसेंबर रोजी शेवटच्या कोविडच्या मृत्यूची नोंद दाखवली गेली होती.

टॅग्स :Chinacovid19global news