श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
शनिवार, 15 डिसेंबर 2018

श्रीलंकेत गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर आता पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विक्रमसिंगे हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी उद्या (रविवार) होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कोलंबो : श्रीलंकेत गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर आता पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विक्रमसिंगे हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी उद्या (रविवार) होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना यांनी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करत 26 ऑक्टोबर रोजी तत्कालीन पंतप्रधान विक्रमसिंगे यांना पदावरून दूर केले होते. त्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाची लगेच शपथ घेतली. मात्र, विक्रमसिंगेंच्या समर्थकांनी या घटनेचा विरोध केला होता. तसेच श्रीलंकेतील संसदेत विक्रमसिंगे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. संसदेत विक्रमसिंगेंनाच बहुमत मिळेल हे माहीत असल्यामुळे मैत्रिपाल सिरिसेना यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत संसदच बरखास्त केली.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत श्रीलंकेच्या संविधानात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रपतींचे अनेक विशेष अधिकार काढून घेण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahinda Rajapaksa Resigns As Sri Lanka Prime Minister