दुबईत भारताकडे येणाऱ्या दोन विमानांचा असा टळला मोठा अपघात; दिले चौकशीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुबईत भारताकडे येणाऱ्या दोन विमानांचा असा टळला मोठा अपघात

दुबईत भारताकडे येणाऱ्या दोन विमानांचा असा टळला मोठा अपघात

नवी दिल्ली : UAE च्या Aviation Investigations Body ने भारताशी निगडीत दोन विमानांच्या अपघातासंदर्भात चौकशी सुरु केली आहे. 9 जानेवारी रोजी दुबई विमानतळावर (Dubai Airport) या दोन विमानांमध्ये जवळपास धडक होऊन अपघात होण्याची परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळेच यासंदर्भात आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. भारताकडे जाणारी दोन विमाने पाच मिनिटांच्या अंतराने एकाच धावपट्टीवर टेक-ऑफसाठी नियोजित होती. जर या दोन्ही विमानांनी नियोजित वेळेनुसार उड्डाणे घेतली असती तर मोठ्या अपघाताची शक्यता होती. मात्र, वेळीच टेक ऑफ तात्काळ नाकारण्यात आल्यामुळे शेकडो जणांचे जीव वाचले, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिलीये. (Air Accident Investigation Sector)

हेही वाचा: आणखी आठ आमदार पक्षात; अखिलेश यादव म्हणतात, 'या भाजपच्या हिट विकेट्स'

"दुबई-हैदराबाद येथून EK-524 विमान धावपट्टी 30R वरून टेक-ऑफसाठी वेग घेत होते, तेव्हा चालक दलाने त्याच दिशेने वेगाने विमान येताना पाहिले. एटीसीने ताबडतोब टेक-ऑफ नाकारण्याच्या सूचना दिल्या. विमानाचा वेग सुरक्षितपणे खाली आला. आणि टॅक्सीवे N4 द्वारे धावपट्टी मोकळी करण्यात आली, ज्यामुळे धावपट्टी ओलांडता आली. दुबईहून बंगलोरला जाणारी दुसरी एक एमिरेट्स फ्लाइट EK-568, त्याच रनवे 30R वरून टेक-ऑफ करणार होती," अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ANI ला दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top