
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची बत्ती गुल! खाण्यासोबत विजेचेही वांदे
Pakistan Economic Crisis: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानवर संकट कोसळले आहे. दैनंदिन वापरात असलेल्या सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
मागील आठवड्यात केंद्र सरकारकडून अन्न वाटप करताना नागरिकांमध्ये हाणामारी झाली होती. तर आता नवी माहिती समोर आली आहे. (Major power outage in Pakistan)
पाकिस्तानमध्ये वीज व्यवस्था बिघडली आहे, त्यामुळे इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीसारखी पाकिस्तानातील मोठी शहरे अंधारात आहेत.
प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 7.30 च्या सुमारास पाकिस्तानच्या नॅशनल ग्रीडची सिस्टम फ्रिक्वेन्सी बिघडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने देशभरातील वीज यंत्रणा प्रभावित झाली आहे.
दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाकिस्तानच्या मीडिया संस्थांनीही कराची, लाहोरमधील अनेक भागात वीज नसल्याचे सांगितले आहे.