Malala Tweet : नवऱ्याचे वास मारणारे मोजे अन्...; नोबेल विजेत्या मलालाचं ट्वीट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

malala-yusufzai

Malala Tweet : नवऱ्याचे वास मारणारे मोजे अन्...; नोबेल विजेत्या मलालाचं ट्वीट चर्चेत

नोबेल पुरस्तार विजेती मलाला युसाफझाई ही सध्या ट्वीटरवर ट्रेंडिंगला आली आहे. तिने आपल्या नवऱ्याच्या पायमोजावर एक ट्वीट केलं आहे. त्यावरून तीला अनेक नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. तर तिचं ट्वीटही अनेकांकडून शेअर केलं जात असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

"घरातील सोफ्यावर मला घाण पायमोजे दिसले. मी मलिक असरला विचारले की, हे मोजे तुझे आहेत का? तर तो म्हणाला ते पायमोजे घाण आहेत आणि मी त्याला दूर ठेवू शकलो असतो. त्यानंतर मी ते पायमोजे घेतले आणि कचराकुंडीमध्ये टाकले." असं ट्वीट मलालाने केलं होतं. त्यानंतर तिला अनेकांकडून ट्रोल केलं जात आहे.

दरम्यान, सध्या तिला या ट्वीटवरून अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्याचबरोबर या ट्वीटवर अनेकांनी आपल्या मजेशीर कमेंट व्यक्त केल्या आहेत. या ट्वीटला आत्तापर्यंत ९ हजार युजर्सने लाईक केलं असून दशलक्ष युजर्सने पाहिलं आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

टॅग्स :tweetMalala Yousafzai