नुपूर शर्मांच्या विधानाचे मालदीवच्या संसदेत पडसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maldives parliament rejects motion that sought condemnation of bjp nupur sharma remarks on prophet

नुपूर शर्मांच्या विधानाचे मालदीवच्या संसदेत पडसाद

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. एका टीव्ही चॅनवनराव चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर इस्लामिक देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. (maldives parliament rejects motion that sought condemnation of bjp nupur sharma remarks on prophet)

यापूर्वी कतार, बहरीन, कुवेत आणि इराणने याचा निषेध केला होता. आता हे प्रकरण मालदीवच्या संसदेपर्यंत पोहोचले आहे. मालदीवच्या संसदेत नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा ठराव मांडण्यात आला. मात्र नुपूर शर्मा यांच्या विधानाविरोधात मांडण्यात आलेला हा ठराव पास होऊ शकला नाही.

मालदीवच्या राष्ट्रपतींनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तर विरोधकांनी उघडपणे नुपूर शर्माविरोधात मते व्यक्त केली. सभागृहात प्रस्तावाच्या बाजूने फक्त 10 खासदारांनी मतदान केले तर 33 खासदारांनी विरोधात मतदान केले. परिणामी हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. विरोधी पक्षनेते शरीफ उमर म्हणाले की, सरकार या विधानावर प्रतिक्रिया देत नाही, जे चिंताजनक आहे.

या वादाच्या पार्श्वभूमिवर पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या शर्मा यांनी गेल्या आठवड्यात एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांचीही अशीच अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

टॅग्स :Bjp